सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या अभिष्टचिंतनपर येथील शहीद भगतसिंग स्मृती समितीतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
कविवर्य विनायक आफळे म्हणाले,”अनिल वीर आमच्या समितीच्या कार्यक्रमात सक्रिय असुन ते सदस्यही आहेत.त्यांना कोणत्याही वेळी घरगुती/सार्वजनिक निरोप देताच ते धावून येतात.अशा सद्गुणी व्यक्तींचा सन्मान करण्यास आमची समिती कायमच सज्ज असते.” यावेळी शिरीष चिटणीस,परवेज सय्यद,संजय बोंडे,दत्तात्रय राऊत आदी समितीचे सदस्य,अशोक भोसले, बी.एल.माने,अशोक मनोहर कांबळे, डी.एस. भोसले, मंगेश डावरे, महादेव मोरे, दिलीप ( महेंद्र) भोसले,वसंत गंगावणे, विलास कांबळे,डॉ.माळगे आदी उपस्थीत होते. पुष्पगुच्छ व पेढे देऊन सुभाष सोनवणे यांनी विशेष असा सत्कार केला. शिवाय,आरपीआयतर्फे केक कापून जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.डॉ.विलास खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली केक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तेव्हा डॉ.अरुण गाडे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे,दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश खंडझोडे, बसपाचे सतीश गाडे,गौतम भोसले आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.