सातारा : बहुजनांच्या अनेक संघटना आहेत. त्याअंतर्गतही मतभेद आहेत.त्यामुळे सर्वच क्षेत्रात वाताहत आढळुन येत आहे.तेव्हा बहुजनांनी संघटीत झाले तरच राजकीय यश मिळु शकेल.अशा आशयाची चर्चा करण्यात आली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या वाढदिवसानिमित्त सकारात्मक चर्चा विविध विषयांवर करण्यात आली.तेव्हा डॉ.विलास खंडाईत, प्राचार्य डॉ.अरुण गाडे व अनिल वीर यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.
यावेळी डॉ.खंडाईत यांनी केक व पुष्पगुच्छ आणुन यथोचित असा सत्कार वीर यांचा केला. सदरच्या कार्यक्रमास डॉ.गाडे यांच्यासह जिल्हा वंचीत बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष संदीप कांबळे, बहुजन समाज पार्टीचे सतीश गाडे,दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश खंडझोडे, बळीराजा सामाजीक संस्थेचे गौतम भोसले आदी विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.