पती सासू सासऱ्यासह नातेवाइकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील गुहा येथील ६ महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह ५ वर्षाचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत मिळून आल्याचे सांगून घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचे शवविच्छेन न करता हिंदू धर्माच्या रीतिरिवाजपणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय रामभाऊ बारहाते, रा.सडे, ता. कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत म्हंटले की, दिनांक ७ जुलै रोजी रात्री फोन आला, त्यावेळी सांगितले की, माझ्या जावयाची बहीण ऋषाली व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत मिळुन आले आहे. मुलगी ऋषाली व अंशु यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्नालयात पाठविले नाहीत तसेच त्यांचे प्रेत घराचे बाहेर असून त्याच स्थीतीमध्ये ठेवुन मृतदेहावर हिंदु धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे कोणतेही विधी न करता त्यांचे प्रेताची अप्रतीष्ठा केली. तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळविने हे गरजेचे असतानाही ऋषाली हिचे सासरे रविंद्र कोळसे, पती हरीभाउ कोळसे, सासु शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी हेतुपरस्पर कळविले नाही, दोन्ही मृतदेहावर गुहा गावातील स्मशनभुमिमध्ये परस्पर अंत्यसंस्कार केले आहेत.
या माहितीनंतर संजय बारहाते यांनी काल सोमवारी राहुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रविंद्र कोळसे, हरीभाउ कोळसे, शारदा कोळसे व इतर नातेवाईक यांनी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केली तसेच घटनेबाबत शासकीय यंत्रणेस कळविणे गरजेचे असताना हेतुपरस्पर माहीती न कळविता परस्पर अत्यसंस्कार केले म्हणुन राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.