वडूज दत्ता इनामदार : येथील दादासाहेब जोतीराम गोडसे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजमध्ये 15 जुलै 2025 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करियर संसद शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्र राज्य उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. बी पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ सविता गिरे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश कथन केला. समन्वयक प्रा. डी. एन कठरे यांनी करिअर कट्टा योजनेच्या माध्यमातून IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून करिअर कट्टा विभागाच्या कार्याची ओळख करून दिली, अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एस. बी पाटील यांनी जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण होत असलेल्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांनी अध्ययना व्यतिरिक्त कोणते ना कोणते कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच स्किल डेव्हलपमेंट कोर्स स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी अनिवार्य करावेच लागतील असे कथन केले.
यावेळी करिअर संसदेच्या अंतर्गत कुमारी भाग्यश्री अजित कंठे मुख्यमंत्री, कुमार संस्कार संभाजी हिरवे नियोजन मंत्री, कुमारी देवकर तेजश्री आनंदा कायदे व शिस्तपालन मंत्री, कुमारी तुपे पायल अंकुश सामान्य प्रशासन मंत्री, कुमार कुणाल मिलिंद भंडारे माहिती व प्रसारण मंत्री, कुमारी नीलम सुखदेव जाधव उद्योजकता विकास मंत्री, कुमारी सानिका ईश्वर काटकर रोजगार स्वयंरोजगार मंत्री, कुमारी माळी अंकिता सुरेश कौशल्य विकास मंत्री, कुमारी इंगळे साक्षी किशोर संसदीय कामकाज मंत्री, तसेच रणवरे अश्विनी नामदेव व भिसे प्रियंका संजय यांची सदस्य पदी निवड करण्यात आली व शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुल्ला एस. बी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास प्रा. सोनल शेटे, प्रा. भोसले मॅडम, प्रा काशीद मॅडम, प्रा. क्षितिज धुमाळ, प्रा. बाबासाहेब साबळे, व ग्रंथपाल भारती माने, लिपिक रियाज मुल्ला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याचे कामकाज प्रा. माधुरी चव्हाण यांनी केले.