खटाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढले 

0

कै अरुणराव बागल यांचेंनतर पंचवीस वर्ष्याने कातर खटाव चे नाव जिल्हा परिषद मध्ये 

वडूज प्रतिनिधी, दत्ता इनामदार 

: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवीन गट, गणांच्या रचनेत खटाव तालुक्यातील कातरखटाव गट व कातरखटावसह दरूज या नव्या दोन गणांच्या निर्मितीमुळे कातरखटावकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. तर नविन दोन गणांमुळे प्रस्थापितांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या नविन गट, गणांच्या फेररचनेमध्ये खटाव तालुक्यात कातरखटाव या जिल्हा परिषद गटाची तसेच कातरखटावसह दरूज या नव्या दोन गणांच्या निर्मिती झाली आहे. यापूर्वी खटाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा व पंचायत समितीचे बारा गण होते. नव्या फेररचनेमध्ये तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात व पंचायत समितीचे चौदा गण झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील एक महत्वाचा राजकीय केंद्रबिंदू तसेच  व्यापारी बाजारपेठ असलेल्या कातरखटावचा स्वतंत्र जिल्हा परिषद गट करण्याची मागणी नागरिकांतून गेली अनेक वर्ष होत होती. आज झालेल्या फेररचनेमुळे कातरखटावकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. याशिवाय कातरखटाव व दरूज या पंचायत समितीच्या नव्या दोन गणांमुळे प्रस्थापितांना मतविभागणीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here