अनिल वीर सातारा : संभाजी ब्रिगेडचे झुंजार नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर संविधानवादी,मानवतावादी, आंबेडकरवादी,पुरोगामी संघटना,पक्ष व.व्यक्ती यांच्यावतीने बुधवार दि.१६ रोजी सकाळी ११ वा.जाहीर निदर्शने आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील तमाम पुरोगामी पक्ष , संघटना , व्यक्ती , कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून निदर्शने आंदोलन व निषेध सभेसाठी मोठ्या संख्यने लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात येत आहे.अशी माहिती जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे (मो.नं.९०७५९५६१६९) व उपाध्यक्ष संदिप कांबळे
(मो.नं.९८२२८६११५२) यांनी केले असुन निषेध सभेस सहभागी होणाऱ्या संघटनेतील नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी संपर्क साधुन आपले नाव मेसेज अथवा फोन करून नोंदवुन वेळेवर उपस्थीत रहावे.असेही आवाहन करण्यात आले आहे.