निवृत्त पोलीस अधिकारी अशोक लांडगे यांचे निधन
सातारा/ प्रतिनिधी : दैनिक लोकप्रभातचे पत्रकार उमेश लांडगे यांचे वडील अशोक किसन लांडगे (वय 62) यांचे अल्प आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले.
त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी बीड, जुन्नर, लातूर , पुणे आदी ठिकाणी पोलीस दलात सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थिरावले होते. शिस्तबद्धता हा त्यांचा स्थायीभाव होता. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. आपल्या मुला, नातवंडांवर सुसंस्कार व्हावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संगम माहूली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.