बुलडाणा,(प्रतिनिधी)- लोणार तालुक्यातील मौजे वेणी जिल्हा बुलडाणा येथे १३ जूलै रोजी भरदुपारी एकवाजेच्या दरम्यान दोन समाजातील तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वेणी गावातील काही जातीयवादी गावगुंडांनी निळा ध्वज उपटून टाकण्याचा प्रयत्न करून महिलांना धक्काबुक्की केली. मोकळ्या जागेभोवती लावलेले तारेचे कंपाऊंड उपटून टाकले. जातीयवादी साथीदारांवर निळाध्वजाचा अवमान करणे, महिलांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे ॲट्रासिटी गुन्हा दाखल करून कठोरातली कठोर कारवाई करून अटक करावी अशी मागणी सम्राट आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी पलीस अधिक्षक बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की हा प्रकार बंदोबस्त अललेल्या पोलिसांसमोर घडत होता व ते उघड्या डोळ्याने पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली. वेणी येथील बौध्द बांधव मेहकर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांची पोलीस प्रशासनाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसून ठेवले व रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलीस कोणाचे तरी दबावाखाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलीस हे जनतेचे रक्षक असतो तो कोण्या जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा नसतो पण येथील परिस्थिती पाहाता पोलीसांनी बघ्याची भूमिका व वेळ काढू पणा दिसत होता. त्यामुळे लोकशाहीची पायमल्ली होत असल्या सारखे दिसत होते.
वेणी येथील बौध्द महीलांनी एक महीण्या आगोदर जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयासमोर स्मशानभूमीची जागा तसेच अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या निळ्या ध्वजाबद्दल नऊ दिवस आमरण उपोषण केले होते उपोषणकर्त्यांची प्रकृती खाल्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी चर्चा करून लेखी स्वरूपात वेणी येथील बौध्द बांधवांची हक्काची असलेली स्मशानभूमीची जागा व निळा ध्वजाबद्दल कोणीच हात लावणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र असे असताना सुध्दा गावातील काही मनुवादी गावगुंडांनी निळा उपटण्याचा प्रयत्न केला महिलांना धक्काबुक्की व लावलेले तारेचे कुंपण तोडले गावगुंड हरामखोर राजू कारभारी जाधव, विष्णू हरणे, त्यांचे व्हीडीओतील जातीयवादी साथीदारांवर निळाध्वजाचा अवमान करणे, महिलांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे ॲट्रासिटी गुन्हा दाखल करून कठोरातली कठोर कारवाई करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे .