अकोले :- ( प्रतिनिधी )
अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस दिलेली मंजुरी ही अनुसूचित जमातींच्या न्याय, हक्क व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त करत हा निर्णय घेतल्याबद्दल मा. आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले असून त्याबद्दल पिचड यांनी सत्कार केला आहे.
वैभवर पिचड यांनी यावेळी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसानाची भरपाई तसेच तालुक्यातील सिंचन, रस्ते विकास, आरोग्य सुविधा या प्रश्नांसह विविध विकास कामांसदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची मा. आमदार वैभवराव पिचड यांनी भेट घेऊन चर्चा करत निवेदन दिले.
भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अकोले तालुक्यातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई तसेच अकोले शहर व तालुक्यातील विविध विकासकामे,रखडलेली व प्रास्तावित सिंचन, रस्तेची कामे,आरोग्याच्या सुविधा, आदि विषयासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी
याचर्चे नंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोले तालुक्यातील अडचणी, सिंचन, रस्ते विकास, आरोग्य सुविधा हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केली जाईल असा विश्वास दिला.