नांदेड प्रतिनिधी :- संततधार पावसामुळे नांदेड तालुक्यातील किक्की .राहेगाव ,भायेगाव येथील शेतकऱ्यांची पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी थेट बांधावर 25 में रोजी जाऊन शेतकऱ्यांचा पिकाची पाहणी केली व महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे सुचना दिल्या.
नांदेड तालुक्यातील किक्की, भायेगाव ,राहेगाव येथे संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर पिके ज्वारी पिके अडवी पडली असुन भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेनेचे भायेगाव ग्राम पंचायत सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर,मंडळ अधिकारी, हेमंत सुजलेगावकर, कृषी सहायक सौ.मगर, तलाठी भांगे नुकसान ग्रस्त गावातील शेतकरी दतराम धोंडीबा खोसडे, गंगाधर माधव कोल्हे, सुरेश भाऊराव खोसडे,माधव बापुराव कोचार, पप्पु डिंगाबर कोल्हे,बालाजी डिंगाबर खोसडे, नागोराव गणपती कोल्हे, यांच्या सह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.यावेळी महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची सुचना दिली आहे.