के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी 

0
download (4).jpg

कोपरगाव प्रतिनिधी : के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. मानसी अरविंद पांडे हिची जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी तैवान येथे होणाऱ्या सी.सी.यू. आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड झाली असल्याचे तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या एकूण ३० विद्यार्थ्यांची हैदराबाद, पुणे व नाशिक येथील विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रो.(डॉ.) विजय ठाणगे यांनी येथे दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट असिस्टन्स सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) संजय अरगडे म्हणाले की, “ज्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या उपरोक्त विद्यार्थ्यांची नोकरी आणि ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे,  ३७१ विद्यार्थ्यांची महाज्योती शिष्यवृत्तीसाठी आणि इतर ३९ विद्यार्थ्यांची अन्य शिष्यवृत्तींसाठी निवड झाल्याने विशेष समाधान वाटत आहे.”

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव एड्.  संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य प्रो.(डॉ.) विजय ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 
निवड झालेल्या उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना प्रो.(डॉ.) वसुदेव साळुंके, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. निलेश पोटे, आदींचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा. विजय सोमासे, प्रा. अजित धनवटे, प्रा.  सुनील गुंजाळ व प्रा. स्वागत रणधीर या सर्व प्राध्यापकांनी  प्लेसमेंट कॅम्पसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here