नाशिक जिल्हा बारा बलुतेदार महासंघाच्या संपर्क पदी सुनील गायकवाड

0

येवला (प्रतिनिधी)

 नाशिक जिल्हा बारा बलुतेदार महासंघाच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील युवक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब (बाबा) डमाळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     बारा बलुतेदार दार संघटनेच्या अडीअडचणींसाठी तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या योजनांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन बाबासाहेब (बाबा) डमाळे पाटील यांनी यावेळी दिले.

बारा बलुतेदार दार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलराव पवार व ज्येष्ठ नेते रमेशराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बारा बलुतेदार लोकांच्या समस्या तसेच शासन दरबारी अडकलेले कामे सोडवण्याचा प्रयत्न करील व हे सर्व करत असताना प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत बांधणी करण्याचा माझा मानस आहे.वेळोवेळीअन्य समाजाच्या ज्येष्ठांचे पण मार्गदर्शन घेईल असे सुनील गायकवाड म्हणाले.

याप्रसंगी बारकू अण्णा मगर, दिगंबर साबळे, कचरूआबा चव्हाण, रावसाहेब मगर,विजय पगारे,बाबासाहेब आसणे,नानासाहेब आसणे,देविदास चव्हाण,ज्ञानेश्वर तुपे, विजय पवार, बाबासाहेब पगारे, सुनील भागवत,दत्ता पवार,अब्बासभाई शहा,शिराजभाई सय्यद,गोरखनाथ ढमाले,गजानन चव्हाण,सचिन पगारे,योगेश पगारे,गंगाधर पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आभार प्रदर्शन व प्रास्ताविक वृषाल डमाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here