वडूज प्रतिनिधी : सांगली जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक सौ.निलम भिमराव नाकाडे यांना राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हुतात्मा अपंग बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सौ.नाकाडे यांना आदर्श महिला प्रशासकीय गौरव हा पुरस्कार देण्यात आला. सातारा येथील दैवज्ञ भवन कार्यालयात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.
यावेळी आमदार मनोज घोरपडे, हुतात्मा अपंग बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनिल फडतरे, डॉ.जालींदर महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते. सौ.नाकाडे यांचे माहेर वडूज असून त्या खटाव पंचायत समितीमधील सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती सुनंदा ओंबासे यांच्या कन्या आहेत. सौ.नाकाडे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.