कोपरगाव : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध भागामध्ये गुरु शिष्याच्या नात्यावर आधारित पथनाट्य सादर केले . या पथनाट्याद्वारे शालेय उपक्रमातील प्रत्येक उपक्रमामध्ये आघाडीवर असणाऱ्या सोमय्या विद्याविहार संकुलातील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुलने आपले वेगळपण वेळोवेळी सिद्ध केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय संस्कृतीमध्ये असलेले गुरुचे महत्व अधोरेखित करताना गुरु शिष्याचे नाते आणि गुरूकडून शिष्याला दिली जाणारी आपली विद्या समाजासाठी कशी उपयोगी पडले. याची काळजी घेताना दाखवण्यात आले. या उपक्रमाबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य के एल वाकचौरे म्हणाले की शारदा विद्यालय शैक्षणिक बाबतीत आघाडीवर आहेच त्याच सोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक खेळ , वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवरही तितकाच भर दिला जातो. गुरुपौर्णिमेचे निमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या गुरु शिष्य परंपरमुळे ज्ञानाचा झरा शेकडो वर्षाचा प्रवास करून आज आपल्या पर्यंत पोहचला आहे. आणि पुढेही हे कार्य असेच निरंतर सुरु राहावा यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. यावेळी लक्षीन डांबरे, वेदांत शिंपी स्वप्नील गाडेकर ,जय शिंदे ,वैभव पाणगव्हाणे या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. हे पथनाट्य यशस्वी करण्यासाठी प्रा बी के तुरकणे,प्रा. व्ही एस आल्हाट ,प्रा. सौ. सुनंदा कदम, प्रा. श्रीमती. नाथलीन फर्नांडिस ,प्रा. सौ.शुभांगी अमृतकर , पल्लवी ससाणे,प्रज्ञा पहाडे यांच्यासह सर्व शिक्षक वृदांनी मोठे परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश सोनपसारे याने अत्यंत सुरेख असे केले .