[
सौ .सविता देशमुख, उपशिक्षिका – पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी ता – सिन्नर जि. नाशिक मो .नंबर 9970860087
_*❂ 📆दिनांक :~ 04 ऑगस्ट 2023 ❂*_
❂🎴 वार ~ शुक्रवार 🎴❂
_*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण. 04 ऑगस्ट
तिथी : कृ. तृतीया/चतुर्थी (शुक्र)
नक्षत्र : शततारका,
योग :- अतीगंड
करण : बव
सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 06:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡कुणाच्याही दबावाखाली आपले विचार दबु देऊ नका, कारण आपण स्वातंञ भारताचे स्वतंञ नागरीक आहोत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌अहो रूपम अहो ध्वनी
🔍अर्थ:-
एकमेकाचे दोष न दाखवता खोटी स्तुती करने.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 216 वा दिवस आहे.
_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_
👉२००१ : मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
👉१९९८ : फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
👉१९९३ : राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.
👉१९५६ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
👉१९४७ : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
👉१९२४ : सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
👉१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
_*💐जन्मदिवस / जयंती💐*_
👉१९६१ : बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
👉१९३१ : नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (मृत्यू: १९ मार्च २००२)
👉१९२९ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (मृत्यू: १३ आक्टोबर १९८७)
👉१८९४ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)
👉१८६३ : महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान (मृत्यू: ? ? ????)
👉१८४५ : सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक. १९१३ मधे ’बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)
👉१८३४ : जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)
👉१७३० : सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
_*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_
👉१९९७ : जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)
👉१९३७ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
👉१८७५ : हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (जन्म: २ एप्रिल १८०५)
👉१०६० : हेन्री (पहिला) – फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉पणजी हे शहर कोणत्या राज्यातील आहे?
🥇गोवा
👉भारताचे सर्वोच्य सेनानी कोण आहेत?
🥇राष्ट्रपती
👉भारतातील शेवटचा मुघल सम्राट कोण होता?
🥇बहादूरशहा (1857)
👉हिन्दू धर्माचे प्रार्थना स्थळ काय आहे?
🥇मंदिर
👉स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
🥇डॉ.राजेन्द्र प्रसाद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻
👨🦰बढाईखोर माणूस
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
🧠तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
सौ सविता देशमुख, उपशिक्षिका- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी ता – सिन्नर (नाशिक )