नागपूर : निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल आमच्या बाजूने लागेल की नाही याबद्दल आम्ही साशंक आहोत. असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला . यावेळी
आ. पवार म्हणले की खा. शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत . त्यामुळे कायदेशीररित्या पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडेच राहील असे आम्हाला वाटते. मात्र निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले बनलेले असल्याने निवडणूक आयोग (Election Commission News Update) आमच्या बाजूने निर्णय देईल का? या बद्दल मला शंका वाटत आहे . निवडणूक आयोग आमच्या विरोधात निर्णय देण्याची शक्यता आहे. पण भविष्यात मात्र न्यायालयीन लढाई आम्ही निश्चित जिंकू. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचला असून त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.