मिच्छामि दुक्कडम्
चुकूनमुद्दाम चुकलं
मागतो मी क्षमापना
मिच्छामी दुक्कडम्
खुपले लागले मना….
कळत नकळत घडे
सान मोठाला गुन्हा
निश्चीत घे काळजी
चूकहोणे नको पुन्हा….
माणूस असे आपण
चुका घडतात नाना
सुधारून सारे प्रमाद
जागे ठेव अभिमाना….
विचार नको फुकाचे
गिळू कसे अपमाना
क्षमस्व जादुई शब्द
राहतीलं ताठ माना….
नवीन फळो पालवी
नात्याला फुटोपान्हा
मागावी करावी क्षमा
आजार घालवा जुना…
दुखविले खूप जणा
दिल्या अतीव वेदना
माणूस आहे आपण
जागृत होई संवेदना…
शांतता लाभो मना
हवी खरी विश्यपना
मिच्छामी दुक्कडम्
जाणा ही संकल्पना…..
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.