एकीकडे कांदा लागवड आणि खताचे दर वाढत असताना दुसरीकडे कांदा काढणीसाठी मजुरी दर वाढले आहेत. मजुरीचे दर वाढूनही मजूर मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पूर्वी कांदा काढणीसाठी एकरी ८ ते ९ हजार रुपये खर्च येत होता. पण आता एकरी १५ ते १६ हजार रुप
.
महागडी खते, बियाणे, रोपे, खुरपणी शिवाय रोगाचा सामना करत पीक घेतले जाते. त्यातच लाल कांदा साधारण साडेतीन महिन्यात, तर गावरान कांदा काढणीसाठी ५ महिने लागतात. एकरी उत्पादन साधारण ९ ते १२ टन निघते. त्यातही दरात चढउतार सातत्याने होत असल्याने एकेकाळी ऊसापाठोपाठ नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे पाहत होते. पण काढणीचा खर्च वाढत चालल्याने तो चिंतेत आहे. तालुक्यात विहीर बागायत आणि सिंचन सोयी असलेल्या ठिकाणी तसेच ऊस गाळपासाठी गेल्यावर कांदा लागवड केली जाते. ते शेतकरी आज लागवड, खुरपणी, काढणीच्या वाढत्या खर्चामुळे आणि दरातील चढउतारा मुळे चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय आहे. पण त्यांनाही याचा सामना कमी-अधिक प्रमाणात करावा लागत आहे. कारण दर वाढताच साठवणुकीतील कांदा सारेच शेतकरी बाहेर काढत असल्याने दर पडतात.
शेतकरी सध्या कांदा काढण्यासाठी एकरी १६ हजार रुपये मजुरीचा खर्च येत आहे. तरीही मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यातच वातावरणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस कधीही येऊ शकतो. आपल्या कांद्याचं नुकसान होऊ शकते, या भीतीने वाटेल तेवढी, मजुरी देऊन आपला कांदा कसा काढता येईल, असा प्रयत्न शेतकरी करत आहेत.