[ad_1]
इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी कंपनीच्या माध्यमातून कच्चे मेटल्स माेठ्या प्रमाणात पुरवताे असे आश्वासन पुण्यातील एका व्यावसायिकाला देऊन दुबई येथे डील करण्याकरिता बाेलावून घेत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्याच्याकडून तब्बल तीन काेटी ७९ लाख ७७ ह
.
याबाबत सुधीर रघुनाथ बाराेट (वय- ६२,रा. रविवार पेठ, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपीचे भागीदार संजय कुमार राघव ऊर्फ भुपेंद्र सिंग, प्रन्नवीर संजय ऊर्फ भुपेंद्र सिंग ( दाेघे रा. दुबई) व एजंट हार्दिक रमेशभाई पानसुरिया (रा. राजकाेट, गुजरात) यांच्यावर खडक पाेलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ६१ (२), ३३५, ३३६ (२), ३३६ (३), ३४० (१), ३४० (२) , ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा प्रकार डिसेंबर २०२३ ते १६/८/२०२४ यादरम्यान घडला आहे. संबंधित आराेपी यांनी संगनमत करुन तक्रारदार यांच्या संस्थेकडून एकूण तीन लाख ७९ लाख ७७ हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारली. पण तक्रारदाराच्या संस्थेस कच्चा मालाचा पुरवठा केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या संस्थेचे खूप माेठे आर्थिक नुकसान झाले. इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी तर्फे भुपेंद्र सिंग व त्यांचा मुलगा प्रन्वीर सिंग यांनी हेतु पुरस्सर कट कारस्थान करुन तक्रारदार संस्थेचा विश्वास संपादन केला. संस्थेची हेतूतः आर्थिक फसवणूक केली. तसेच टु मार्क इंटरनॅशनल कंपनी तर्फे एजंट हार्दिक पानसुरिया यांनी सदर आराेपींशी हातमिळवणी करुन सदर व्यवहार करण्यासाठी मध्यस्थी केली. त्यामुळे सदर तिघांविरोधात पाेलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
[ad_2]