शिंदे गटाचे नेते हे चु.. आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते महाराष्ट्राच शत्रू आहेत. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या शुन्य नशीबी येणार आहे, त्यांना हे नको आहे. त्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्ह
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार अनेकदा सोबत आलेले आहेत. आम्ही तसे एकनाथ शिंदे सोबत तुम्हाला कधी दिसलो का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. आम्ही शिंदे गटाला भेटणार नाही. आमच्याकडे संस्था नाहीत, जेथे एकत्र आलो आणि बंद दाराआड बसलो, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.
नेत्यांची भूमिका गांभीर्याने घ्यावी
संजय राऊत म्हणाले की, दैनिक सामनामध्ये जे लिहले आहे, त्याच भावना आतापर्यंत महाराष्ट्राच्या होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत महाराष्ट्राची सूत्र हाती घ्यावी ही जनभावना आहे. हीच भावना ठाकरे बंधूंनी व्यक्त केली आहे. दोन प्रमुख नेते अशी भूमिका मांडतात तेव्हा आपण ती गांभीर्याने घेत पुढे जायला हवे.
शेतावर अन् शाखेत जावे लागेल याची भीती
संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेकांना वेदना होणार. यांनी दोघांनी एकत्र राजकारण केले तर आम्हाला कायमचे शेतावर जावे लागेल किंवा संघ शाखेत जात संघ दक्ष हेच करावे लागेल. महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम केले आहे.
महाराष्ट्रात हुकुमशाहीविरोधात एकत्र लढत दिली
संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबियांवर राज्यातील जनतेचे असलेले प्रेम यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून काहीच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. महाराष्ट्रात चांगले काही घडावे आणि राज्याने हुकुमशाहीविरोधात एकत्र लढत दिली आहे, हे विसरू नये.
भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण
संजय राऊत म्हणाले की, कुणी काही बोलू द्या कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही. जेव्हा उद्धवसाहेबांनी ठरवले आहे की एक पाऊल पुढे टाकायचे मागे काय झाले या कडे दुर्लक्ष करत पुढे जाणार आहोत. यापूर्वी काँग्रेससोबत नव्हतो तेव्हा त्यांच्यावर आम्ही अनेक टीका केल्या पण जेव्हा एकत्र यायचे ठरले तेव्हा आम्ही भविष्याचा विचार केला, मागे वळून पाहिले नाही. भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण असते.
आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश
संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केजली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हा आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे.