[ad_1]
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारे १ ते ३० मे दरम्यान श्री क्षेत्र श्रद्धा सागर येथे बालसंस्कार व सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन केले आहे.
.
बालसंस्कार शिबिरांचे आद्यजनक श्री संत वासुदेव महाराजांनी बालसंस्कार शिबिराचे गावोगावी आयोजन करून संस्कार रुजवले आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे स्मरण करीत संस्था प्रतिवर्षी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करीत आहे.
या बालसंस्कार व सर्वांगीण विकास शिबिराच तज्ज्ञ मार्गदर्शक, शिक्षकांची नेमणूक केली आहे. या निवासी शिबिरासाठी विद्यार्थी प्रवेश मर्यादित आहेत. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेश नि:शुल्क राहिल. शिबिरात आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, ज्ञान- विज्ञान, संगणक प्रशिक्षण, योगासने, प्राणायाम, मनोरंजन, संगीत, खेळ व कला विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिबिरात फक्त १२ वर्षांवरील मुलांना प्रवेश मिळणार आहे, असे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारे कळवले आहे.
वारकरी शिक्षण संस्था; ३० ला शुभारंभ स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची मान्यताप्राप्त उपशाखा श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे सुरू होत आहे. या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ ३० मे रोजी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या हस्ते होणार आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात आपल्या नावाची नोंद करावी.
[ad_2]