‘बियरसारखं पी’ परेश रावलांना अजय देवगणच्या वडिलांनी दिला लघवी पिण्याचा सल्ला; 15 दिवसांनी जे झालं…’ – Pressalert

0

[ad_1]

Paresh Rawal: सिनेप्रेमींमध्ये परेश रावल यांच्या चित्रपटांमधील मजेदार पात्रे नेहमी चर्चेत आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परेश रावल यांचे चाहते अजूनही त्यांच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत असतात. परेश रावल यांनी अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत केलेले काम चाहत्यांनी खूप पसंत केले गेले आहे. त्यांच्याशी संबंधित काही मनोरंजक किस्से आजही चवीचवीने सांगितले जातात. आता परेश रावल यांनी स्वतः वीरू देवगण यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलंय. यावरुन परेश रावल ट्रोलदेखील होतायत. काय आहे हा किस्सा? जाणून घेऊया. 

परेश रावलांनी का केले मूत्र सेवन?

परेश रावल यांनी अलीकडेच एका पोर्टलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास भाष्य केले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगतात आपण 15 दिवस लघवीचे सेवन केल्याचे सांगितले. यामुळे माझ्या पायाची दुखापत बरी होण्यास खूप मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले. मिड डेने यासंदर्भात वृत्त दिलंय. परेश रावल यांचा पाय खूप दुखत होता. डॉक्टरचे उपचार सुरु होते पण दुखापत बरी व्हायला साधारण 2 महिन्याचा कालावधी लागणार होता. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. मग त्यांना दिवंगत अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी एक सल्ला दिला. पायाची दुखापत बरी करायची असेल तर लघवी पिण्यास त्यांना सांगितले. हा सल्ला कृतीत आणून मी 15 दिवसांत बरा झालो. हे पाहून डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले. 

‘सकाळी उठल्यानंतर लघवी पी’

हा मनोरंजक किस्सा सांगताना परेश रावल म्हणाले, ‘मी रुग्णालयात असताना वीरू देवगण मला भेटायला आला. त्याने विचारले की काय झाले? मी त्याला सांगितले की माझ्या पायाला दुखापत झालीय.’ वीरू देवगणने मला दुखापत बरी करण्याचा उपाय सांगितला. त्याने मला सकाळी उठल्यानंतर लघवी पिण्याचा सल्ला दिला. आणि दारू, मटण किंवा तंबाखू खाणे बंद करावे लागेल, असेही त्याने मला सांगितल्याचे परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितले.  

डॉक्टर झाले आश्चर्यचकित

मी विचार केला की जर मला ते प्यावे लागले तर मी ते असे गिळणार नाही. मी ते बिअरसारखे घोट घोट करून पिईन. जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कारण जी दुखापत 2 महिन्यांपेक्षा जास्त काळात बरी होणार होती ती लवकर बरी झाली, असे परेश रावल सांगतात.

(Disclaimer –  प्रिय वाचक, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. यात अभिनेत्याने सांगितलेला किस्सा जसाच्या तसा सांगण्यात आलाय. ‘झी 24 तास’ याला दुजोरा देत नाही. आरोग्याशी संबंधित माहिती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here