छोट्या टेम्पोवर बांधून नेल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या थेट कारमध्ये घुसून कारचालक जखमी झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. या घटनेमुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आह
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये एक टेम्पो लोखंडी सळ्यांची वाहतूक करत होता. हा टेम्पो रस्त्याने जात असताना अचानक कार समोरच्या दिशेने ओलांडते. यावेळी टेम्पो चालकाने आपल्या वाहनाचे करकचून ब्रेक मारले. त्यानंतर टेम्पोवर बांधलेल्या लोखंडी सळ्या सरकन खाली पडल्या. यावेळी काही सळया कारमध्ये शिरल्या. पण सुदैवाने त्यात कार चालक किरकोळ जखमी झाला. लोखंडी सळ्या समोरची काच भेदून थेट कारमध्ये शिरल्यामुळे एकच खळबळ माजली. या घटनेचा संपूर्ण थरार या भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहेत. काहींनी या प्रकरणी नक्की कुणाची चूक झाली हे समजले नाही असे म्हटले आहे. तर काहींनी या घटनेसाठी कार चालकाला जबाबदार धरले आहे. काही नेटकऱ्यांनी लांबलचक सळ्या नेण्यासाठी टेम्पो चालकाला दोष दिला आहे.
खाली पाहा व्हिडिओ
भंडाऱ्यात अपघातात 4 ठार
दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यात बोलेरो कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांत एका महिलेसह 5 वर्षीय मुलीचा सहभाग आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा…
उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशहा:त्यांच्या डोक्यात सतत स्कॅमचेच विचार येतात, भाजप नेते आशिष शेलार यांचा घणाघात
मुंबई – उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा आहेत. त्यांच्या डोक्यात सदा न कदा केवळ घोटाळ्यांचेच विचार येतात, असा घणाघात भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना केला आहे.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये नुकतीच भाजपची कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मुंबई मनपा उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 वर्षे होती. सद्यस्थितीत मुंबईतील एक चौरस फुट क्षेत्रफळाच्या जागेला लाखोंची किंमत आहे. पण ठाकरे यांनी पालिका ताब्यात असताना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकट बिल्डरांच्या घशात घातले. त्यामुळे त्यांना आम्हाला कोणताही जाब विचारण्याचा अधिकार नाही. वाचा सविस्तर