Shaheed Afridi Recevied 24K Gold Plated Iphone 16 Pro as Gifts in PSL 2025

0


PSL 2025 Shaheed Afridi Gold Iphone Gifts : इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरु आहे. तुम्ही पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये कराची किंग्सला आपल्या खेळाडूंना हेअर ड्रायर आणि दाढी ट्रीमर गिफ्ट देताना पाहिलं असेल.त्यानंतर आता लाहोर कलंदर्सने आपल्या खेळाडूंना ईस्टर निमित्त खास भेटवस्तू दिल्या आहेत. कर्णधार शाहीन शाह अफरीदी (Shaheen Shah Afridi) याला याप्रसंगी असं गिफ्ट मिळालं जे पाहून तो स्वतः थक्क झाला. 

पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्सचा कर्णधार शाहीन शाह अफरीदी याला कस्टमाइज केलेला 24 कॅरेट गोल्ड-प्लेटेड iPhone 16 Pro भेट देण्यात आला आहे. जेव्हा त्याने हे भेटवस्तू उघडली तेव्हा तो स्वतः आश्चर्य चकित झाला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. यापैकी एका व्हिडीओमध्ये शाहीन आफ्रिदीला बोलताना पाहिलं की, ‘हा खूप जड आहे’. तसेच जेव्हा तो हे गिफ्ट घेऊन मैदानातून बाहेर पडत होता तेव्हा इतर खेळाडूंना सुद्धा तो सोन्याचा आयफोन पाहण्याचा मोह आवरला नाही. सध्या शाहीन शाह अफरीदीचा संघ लाहौर कलंदर्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. शाहीनने या सीजनमध्ये 7.80 च्या इकॉनमीने पाच विकेट घेतले आहेत. तो त्याचा संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज आहे. 

हेही वाचा : 8 पैकी 6 मॅच हरले, तरीही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते CSK? असं आहे समीकरण

इस्लामाबाद युनाइटेड चार सामन्यात आठ पॉईंट्स सोबत पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थानी आहे. कराची किंग्स चार सामन्यात चार पॉईंट्स सह तिसऱ्या स्थानी आहे. संघाने दोन सामने जिंकले असून दोन सामन्यात ते पराभूत झाले आहेत. 

तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी पाकिस्तान सुपर लीगमध्ये इंग्लंडच्या जेम्स विंसला कराची किंग्सकडून भेटवस्तू म्हणून हेयर ड्रायर देण्यात आला होता. तर लाहौर कलंदर्स विरुद्ध सामन्यानंतर हसन अली याला सुद्धा ट्रिमर भेट देण्यात आला होता. लाहौर कलंदर्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here