Virar Police Arrested Accused After 21 years Rape of stepdaughter and murder of wife | सावत्र लेकीवर बलात्कार आणि बायकोचा खून: 21 वर्ष नाव बदलून राहिला आरोपी, अखेर धारावीत सापळा रचत केली अटक – Mumbai News

0

[ad_1]

तब्बल 21 वर्षांपासून फरार असलेला खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी केली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा दोनच्या युनिटने. साजिद उर्फ परवेज शेख (55) असे या आरोपीचे नाव आहे. 2004 साल

.

काय होते प्रकरण?

आरोपीच्या विरोधात 20 मे 2004 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या सावत्र पित्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले होते, ज्यातून ती गरोदर राहिली होती. या घटनेची माहिती तिने तिच्या आईला दिली होती. आईने आरोपीला जाब विचारला, याचा आरोपीला राग आला. रागाच्या भरात आरोपी साजिद आली शेखने तिला बेदम मारहाण करत जमिनीवर आपटून खून केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

आरोपी साजिद अली शेख याने स्वतःची ओळख लपवली होती. 21 वर्ष तो परवेज आशिक अली या नावाने धारावीमध्ये राहत होता. पोलिसांनी याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. अखेर 21 वर्षांनी पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत. गुन्हे शाखा दोनच्या युनिटने तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे साजिदचा ठावठिकाणा शोधून काढला व सापळा रचून त्याला अटक केली.

धारावी येथील जामा मस्जिदजवळ असलेल्या चामडा बाजार येथे तो राहत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साजिदला अटक केली. सध्या आरोपी साजिदला पुढील कारवाईसाठी विरार पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिली आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here