Prithviraj Chavan Asked Question to PM Modi Over Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत द्यावी: पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी, म्हणाले – अधिवेशन बोलावून सर्वांचा विश्वास संपादन करावा – Kolhapur News

0

[ad_1]

ऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचे वस्तुस्थिती करणारे कथन करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सांगावे तसेच जगातील एकही देश आपल्या मागे का नाही याचे उत्तर पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री यांनी द्य

.

ऑपरेशन सिंदूर मधील सैन्य दलाच्या यशाबद्दल जिल्हा काँग्रेसने आज साताऱ्यात जय हिंद यात्रा यात्रा काढली होती. तसेच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34 व्या पुण्यतिथी निमित्त तसेच हल्ल्यात मृत्यू झालेले नागरिक व शहीद सैनिकांना काँग्रेस भवन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले युद्ध करण्यापूर्वी पाकिस्तानला पूर्व सूचना दिली होती का? त्यामुळे त्यांना तयारी करण्यास वेळ मिळाला याचाही खुलासा परराष्ट्रमंत्री यांनी करावा, अशी टीका त्यांनी केली.

ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य दलाच्या कामगिरीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा सरकारला पहिल्यापासून पाठिंबा होता. पण याबाबत नेमके काय झाले? याची माहिती केंद्रीय नेतृत्वाने सर्व देशाला विश्वासात घेऊन दिली पाहिजे व संसदेचे याबाबत विशेष अधिवेशन झाले पाहिजे अशी आग्रह पूर्वक मांडणी चव्हाण यांनी केली.

तत्कालीन पंतप्रधानांनी युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये वेळोवेळी संसदेच्या अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे. कोणत्याही पंतप्रधानांनी अशी माहिती लपवलेली नाही. या प्रकारे अधिवेशन घेऊन माहिती देणे देश व लष्कराचे मनोधैर्य वाढते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देऊन लष्कराचा मान सन्मान राखायला हवा असे काही होताना दिसत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वपक्षीयांचा आणि सैन्याचा विश्वास संपादन करावा, असेही चव्हाण म्हणाले.

चव्हाण पुढे म्हणाले, युद्धाबाबत पाकिस्तान सरकारला पूर्व सूचना दिली होती का जेणेकरून त्यांना तयारी करण्यास वेळ मिळाला? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे. याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमात भारताची सहा विमाने पाडली अशी चर्चा होते. हे परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. आपला विजय होऊ नये जगातील एकही देश आपल्या मागे नाही याचे उत्तर पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री यांनी द्यावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

युद्धबंदी ही अमेरिकेच्या दबावाखाली झाली का? याचेही उत्तर मिळावे. त्या चार आतंकवाद्यांचे काय झाले? अमेरिकेने जर ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारले तर आपण काय केले? मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही देवाण-घेवाण झाली का? याचेही उत्तर त्यांनी द्यावे. एकूणच परिस्थितीबाबत विदेश मंत्री जयशंकर यांचे नेतृत्व शंकास्पद असून यावर पंतप्रधान काही बोलायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण तयारीनिशी उतरणार असून त्याची तयारी आम्ही केलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय तत्कालीन परिस्थितीत होईल. तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बदला संदर्भात बोलताना ते म्हणाले, याबाबतचा निर्णय प्रदेश कार्यकारणी व पक्षश्रेष्ठी घेतील.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here