Babar Azam : जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या युट्युब चॅनलवर सुद्धा भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. यात पाकचे स्टार क्रिकेटर्स बाबर आजम (Babar Azam) , मोहम्मद रिजवान, शाहिद अफरीदी इत्यादींचा समावेश होता. मात्र यानंतर क्रिकेटर बाबर आझमने पाकिस्तानी सैन्याला दहशतवादावरून सुनावलं आहे. त्याने म्हटले की घाणेरड्या राजकारणामुळे पाकिस्तानच्या लोकांना या त्रासाला समोर जावं लागत आहे.
बाबर आझमने काय म्हटले?
न्यूज 18 ने याबाबत माहिती देत असताना बाबर आझमच्या इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझमने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून म्हटले की, ‘एक क्रिकेटर म्हणून मी नेहमी भारतात खेळण्यासाठी उत्साहित असतो, मी मला ते स्वतःच दुसरं घर मानतो. पण ही खूप खेदजनक गोष्ट आहे की माझं इंस्टाग्राम अकाऊंट भारतात बॅन करण्यात आलंय. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की पहलगाम हल्ल्याशी क्रिकेटर्सचा काहीही संबंध नाही’.
बाबर आझमने पुढील पोस्टमध्ये पाकिस्तानी आर्मीवरला सुनावलं. त्यांनी लिहिले की, ‘पाकिस्तान आर्मीच्या घाणेरड्या राजकारणामुळे हे का होतंय हे सर्वच पाहतायत. मी नाव घेणार नाही पण सर्वांना माहितीये की खरी शक्ती कोणाकडे आहे आणि कोण दहशतवाद्यांना सपोर्ट करतय. पाकिस्तानी आर्मीमुळे सामान्य लोकांना त्रास होतंय. दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करा. पाकिस्तान जिंदाबाद’.
हेही वाचा : टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडी कार? किंमत ऐकून थक्क व्हाल
बाबर आझम हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. इंस्टाग्रामवर त्याचे अर्ध्याहून जास्त फॉलोअर्स भारतीय आहेत. भारतात त्याच इंस्टाग्राम अकाउंट बॅन झाल्यामुळे त्याची इंस्टाग्रामवरील इंगेजमेंट कमी झाली असावी. ज्यामुळे बाबर त्रासलेला दिसतोय. बाबर आझम क्रिकेटमध्ये सध्या चांगल्या फॉर्मात नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.