डीएमआयसीत अनेक उद्योगांची उभारणी केली जात आहे.
तालुक्यातील बिडकीन येथील डीएमआयसीसाठी पुन्हा नव्याने ८ हजार एकरजमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया १५ ते २० दिवसांत सुरू होणार आहे. शिवाय डीएमआयसी अंतर्गत गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ११
.
यापूर्वी बिडकीन डीएमआयसी विकसित करण्यासाठी ८ हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यातील काही कंपन्यांची कामे वेगाने सुरू असून कंपन्यांचे इमारत बांधकाम व उत्पादन निर्मितीला या वर्षीअखेर वेग येणार आहे. प्रमुख सहा कंपन्यांचे उत्पादन आगामी दोन वर्षांतच सुरू होईल अशा पद्धतीने कामे सुरू झाली आहेत.
शेतकऱ्यांना एकरी ४० लाखांच्या दराची आशा
१३ वर्षांपासून बिडकीन डीएमआयसीसाठी जमीन देणाऱ्याशेतकऱ्यांना एकरी २३ लाखांचा भाव मिळाला होता, तर आतानवीन प्रक्रिया जमीन संपादित करण्यासाठी होणार असून यासाठीसाधारणपणे ४० लाखांच्या पुढे भाव मिळण्याची आशाशेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.