[ad_1]
हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून काही सामान विकत घेण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म विचारला पाहिजे, असे वक्तव्य नीतेश राणे यांनी केले आहे. तर दुकानदाराला हनूमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.
.
नीतेश राणे म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मारण्याआधी त्यांनी आपला धर्म विचारला आणि मग मारले. पण आता आपण काही विकत घेण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला पाहिजे, तुम्हाला जर धर्म विचारुन मारले जात असेल तर तुम्ही सामान धर्म विचारत घेतले पाहिजे, असे त्यांनी दापोलीमध्ये एका जनसभेला संबोधित करताना म्हटले आहे.
..तर हनुमान चालीसा म्हणायला सांगा
नीतेश राणे म्हणाले की, तुम्ही सामान घ्यावे म्हणून काही दुकानदार त्यांचा धर्म सांगणार नाही किंवा खोटं सांगतील. त्यांनी जर हिंदू सांगितले तर त्यांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा, ती म्हणता आली नाही तर त्यांच्याकडून काही घेऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
आम्ही त्यांना दूध पाजू अन् नंतर आम्हाला चावू
नीतेश राणे म्हणाले की, जर ते त्यांच्या धर्माबद्दल इतके कट्टर आहेत तर आपण त्यांना श्रीमंत का बनवत आहोत? जर ते धर्मासाठी जिहाद करत असतील तर आपण त्यांच्याशी बंधुत्वाबद्दल का बोलतो? तुम्ही या धार्मिक मेळाव्यातून शपथ घ्यावी की आतापासून आम्ही फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करू, मग ते कसे थरथर कापू लागतील ते पहा… आम्ही त्यांना दूध पाजू आणि नंतर आम्हाला चावू. औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारले, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले, स्वतःच्या भावाला आणि वडिलांना मारले. जे लोक स्वतःच्या लोकांसोबत उभे राहिले नाहीत, ते तुमच्यासोबत कसे उभे राहतील, याचा विचार करा.
[ad_2]