Shikhar Dhawan Slams Shahid Afridi over Pahalgam Terror Attack statement post goes viral | शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला दाखवून दिली आपली जागा; म्हणाला, ” आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही…”

0


Pahalgam Terror Attack: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक कटु झाले आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला झाला आहे. यामध्ये भारताचे २६ लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यानंतर भारतातील जनतेचा राग शिगेला पोहोचला आहे. यात भर म्हणजे पाकिस्तानकडून अनेक लज्जास्पद विधाने येतच आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानने काही केलं आहे याचे भारताकडून पुरावे मागितले. एवढंच नाही तर त्यांनी आठ लक्ष भारतीय सैन्य काय करत होते असाही टोमणा मारला. भारत सरकारवर आपल्या लोकांचे जीव घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर बरीच टीका झाली. आता  पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चांगलेच फटकारले आहे. शाहिदच्या प्रश्नांना आता शिखर धवनकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे. काय म्हणाला शिखर धवन जाणून घेऊयात… 

काय म्हणाला शिखर धवन? 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत धवन म्हणाला की, “कारगिलमध्येही हरवलं होतं. आधीच पातळी सोडली आहे आता अजून किती पातळी सोडणार,  उगाचच कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले.” यानंतर त्याने या पोस्टवर शाहिद आफ्रिदीलाही टॅग केले. पुढे लिहित धवन म्हणाका की, “आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!” 

हे ही वाचा: “नालायक हो-निकम्मे हो…” पहलगाम हल्ल्यावर शाहिद आफ्रिदी जे बोलला ते ऐकून तुमचे रक्त खवळेल, बघा Viral Video

 

काय म्हणालेला शाहिद आफ्रिदी?

शाहीद आफ्रिदीने सामा टीव्हीवर मुलखात देताना सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने भारतीय सैन्याविरुद्ध गरळ ओकली आहे. तो म्हणाला की, “जर तिथे (जम्मू आणि काश्मीर) फटाके फुटले तरी ते पाकिस्तानने केले आहे असे म्हणतात. काश्मीरमध्ये तुमचे 8,००,००० सैनिक आहेत आणि तरीही हे घडले. याचा अर्थ तुम्ही निरुपयोगी आणि अक्षम (“नालायक हो-निकम्मे हो) आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही.”

हे ही वाचा: IPL 2025 धामधुमीत क्रिकेट विश्वात शोककळा, 34 वर्षीय खेळाडूचं आकस्मिक निधन

 

भारत सरकारने शाहिदचे युट्यूब चॅनेल केले ब्लॉक 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरवर (Shoaib Akhtar) मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

हे ही वाचा: सुपरमॅन! दुष्मंथा चामीराचा चमत्कार, गरुडासारखी झेप घेत पकडला भन्नाट कॅच, हा Viral Video एकदा बघाच

क्रिकेट सामन्यांचं विश्लेषण आणि जागतिक क्रिकेटवर नेहमी भाष्य करत असल्याने शोएब अख्तर भारतातही लोकप्रिय आहे. केंद्र सरकारने फक्त शोएब अख्तरवर कारवाई केली नसून, त्याच्यासह इतर 16 इतर चॅनेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्म्सचे एकत्रितपणे सुमारे 6.3 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. त्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here