[ad_1]
हिंगोली जिल्ह्यात महावितरणाच्या एजी पॉलिसीमध्ये १३ कोटींंचे कामे वाटल्या प्रकरणात संशयाची सुई ‘ शेखी‘ मिरविणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे फिरू लागली आहे. विशेष म्हणजे चौकशी सुरु होताच या अधिकाऱ्याने तातडीने इतरत्र बदली करून घेतली. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्या
.
हिंगोली जिल्ह्यात एजी पॉलिसीमध्ये महावितरणच्या एका आदेशाचा योग्य पध्दतीने अर्थ लावून निवीदाना प्रतिसाद न मिळाल्याचे दाखवून १३ कोटींची कामे कंत्राटदारांना वाटप केली. तर कंत्राटदारांनीही पदरी पडलेली कामे अवघ्या दोनच महिन्यात पूर्ण करून गतीमानचेचा अनुभव शेतकऱ्यांसह महावितरणला दाखवून दिला आहे. मात्र सदर कामे करतांना कुठल्याही प्रकारचे निकष पाळल्या गेले नसल्याचा आरोप होऊ लागला आहे.
यामध्ये प्रामुख्याने खांब उभे करतांना खड्डे कमी खोलीचे करून त्यात खांब उभे केले तर काही ठिकाणी खड्यांमध्ये सिमेंटही भरण्यात आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळेच मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात व वादळी वाऱ्यामध्ये विज कंपनीचे खांब तुटुन पडले अन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेष म्हणजे काही ठिकाणी रोहित्र बसविण्यात आलेले खांब देखील पडल्यामुळे कामांचा सुमार दर्जा स्पष्ट होऊ लागला आहे.
या कंत्राट वाटपामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याचाही मोठा हात असून सेवानिवृत्तीच्या काही दिवसात आधीच वाटप झालेले कंत्राट चर्चेचा विषय बनले आहे. यामध्ये जिल्हयातील सधन तालुक्याच्या एका तथाकथीत कंत्राटदाराचाही हात असल्याचे बोलले जात आहे. सदर कंत्राटदार हिंगोलीसह नांदेड विभागातील अधिकाऱ्या गळ्यातील ताईत असल्याचे बोलले जात आहे. या कंत्राटदारापुढे महावितरण गुडघे टेकत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान या प्रकरणात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयानेच स्वतःहून चौकशी सुरु केली असल्याचे सुत्रांनी सांगितले. गोपनिय पध्दतीने सुरु असलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतरही कोणावरही कारवाई का झाली नाही हा नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल उघड करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
[ad_2]