देशात व राज्यात सध्या जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या टाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना धर्म विचारून दुकानातून सामान विकत घेण्याचे सांगत आहे, अशा तिखट शब्दांत काँग
.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी नुकतेच दापोली येथील सभेत हिंदू धर्मियांना दुकानदारांकडून धर्म विचारून खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला होता. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा. विशेषतः त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत देशात व राज्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये दोन जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या केल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारचा साडेचार फुटाचा एक मंत्री जनतेला जात विचारून दुकानातून सामान घेण्याचे सांगत आहे, असे ते म्हणाले.
आम्हीही ‘चुनचुनके’ मारू
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत. पण आमचे दिवस आले तर आम्हीही चुनचुनके मारू. एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय परिस्थिती आहे. त्यांचा केवळ वापर केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे पहावे लागेल. सरकारने सीबीआय व ईडीला बाजूला करावे. त्यानंतर काय होते ते पहावे.
या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. यांना 10 दिवस लोटले तरी पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीत. ते कधी ते सापडणार? हे या सरकारने सांगावे. अतिरेक्यांचे कपडे भेटले, लोकेशन भेटले, मग अतिरेकी का सापडत नाहीत.
..तर राज – उद्धव ठाकरेंचा सत्कार करणार
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. तसेच असे खरेच घडले तर त्यांचा सत्कार करण्याचेही संकेत दिले. दोन भाऊ एकत्र येत असताना त्याची चिंता भाजपला लागली आहे. पण हे दोन भाऊ खरेच एकत्र येत असले तर त्यांनी सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावे. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन त्यांनी एकत्र यावे. असे झाल्यास आम्ही स्वतः त्यांचा सत्कार करू, असे ते म्हणाले.
हे ही वाचा…
लाडक्या बहिणींना 2100 देता येणार नाहीत:संजय शिरसाट यांनी सांगितली वस्तुस्थिती; म्हणाले – पाय छाटून पळ म्हणणे बरोबर नाही
छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या प्रकरणी आपल्याला वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल, अशी कबुली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या मुद्यावर महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पाय छाटून पळ म्हणणे बरोबर नाही, असेही शिरसाट यावेळी निधी वाटपावरून अजित पवारांवर निशाणा साधताना म्हणाले. वाचा सविस्तर