[ad_1]
कॅनडात खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका नागरिकाला सायबर चोरट्यांनी ऑनलाइन 21 लाख 22 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनिरुद्ध अनिल थरवल यांनी इंस्टाग्राम साईटवरील अनोळखी व्यक्तीच्या विरोध
.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात आर्थिक फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 31/12/2023 ते 31 /8/ 2024 या दरम्यान घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार अनिरुद्ध थरवल हे नोकरी करत आहेत .सोशल मीडियावर इंस्टाग्राम या साईटवर ते परदेशातील नोकरी संदर्भात पाहणी करत असताना, त्यांना इंस्टाग्रामसाईट वरील मायोको कोलीन नावाच्या अनोळखी व्यक्तीने संपर्क करून कॅनडा या देशात चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवले.
त्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची माहिती देऊन त्यांच्या विश्वास संपादन करण्यात आला. तसेच वेगवेगळी कारणे देत वेळोवेळी पैसे घेऊन तक्रारदार यांना नोकरी दिली नाही तसेच तक्रारदार यांचे पैसे देखील परत केले नाही. अशाप्रकारे तक्रारदार यांची आरोपीने एकूण 21 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे .याबाबत पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची आर्थिक फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 33 वर्षीय तरुण आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्याला एक ॲप उघडण्यास सांगितले. ॲपद्वारे तरुणाला गुंतवणूक योजनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी आठ लाख 18 हजार रुपये जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला परतावा दिला. मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही तसेच फसवणूक केली.
[ad_2]