नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील धापेवाडा येथे क्षुल्लक कारणाहून मोठ्या भावाला पक्षी मारण्याच्या भ्रमार छऱ्याच्या बंदुकीने छातीत गोळी मारून कुटुंबीयांसमोरच ठार मारल्याची घटना घडली. इंद्रजितसिंग छगनसिंग भोंड (३८, धापेवाडा, कळमेश्वर) असे मृतकाचे न
.
कौटुंबिक करणाहून दोघा भावांमध्ये सतत खटके उडत असे. आरोपीची पत्नी ३ वर्षापूर्वी माहेरी गेली. आरोपीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याची मुलगी मतिमंद आहे. या मुलीची वहीणीने देखभाल करून सांभाळ करावा, अशी आरोपीची अपेक्षा होती. याच कारणाहून तो भांडत असे. यातच वहिणीने मुलीचे सोन्याचे लॉकेट चोरल्याचा आरोप सुद्धा आरोपीने केला. हे लॉकेट परत द्यावे असा भावाकडे तकादा लावला होता. यावरून घरातील वातावरण तापले होते.
घटनेपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. मृतक इंद्रजितसिंग छगनसिंग भोंड घरातील हॉल मध्ये दिवाणवर जेवण करीत होता. त्याची पत्नी त्याला जेवण वाढत होती. तेवढ्यात आरोपी जगजीतसिंग उर्फ जग्गु छगनसिंग भौड दुसऱ्या रूममधून भ्रमर बंदूक घेऊन आला. हे पाहुन मृतक इंद्रजितसिंग छगनसिंग भोंड याची मोठी मुलगी लहान भावाला घेऊन दुसऱ्या रूममध्ये पळून गेली. यातच त्यांची आई बिशनकौर छगनसिंग भौड (वय ७२) हिने आरोपी इंद्रजितसिंग छगनसिंग भोंड याला प्रोत्साहित केले. परिणामी आरोपीने भावाच्या पत्नी समक्ष बंदूक चालविली. त्यातच भाऊ जमिनीवर पडला. बंदुकीचा आवाज ऐकून आजूबाजूचे सर्व लोक घरात आले. त्यांनी आरोपीना बेदम मारहाण केली.
माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटना स्थळ गाठले. त्यांनी बंदूक जप्त केली. आरोपी भाऊ जगजीतसिंग आणि आई बिशनकौर यांना नातेवाईकांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. सावनेर पोलिसांनी आरोपी आणि त्याची आई यांच्यावर कलम १०३ (१), ३ (५), भारतीय न्याय संहिता सह कलम ३, ५ अन्वये गुन्हा दाखल केला.