नांदगाव पेठ येथील सय्यदपुरा निवासी ऑटो रिक्षाचालक शेख जहीर शेख रशीद (वय ३८ वर्षे) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. उकडी शिवारातील शेत सर्वे नंबर १०५ मध्ये असलेल्या धुऱ्यावरील हिवराच्या झाडाला गळफास घेतलेल्या आणि क
.
या प्रकरणी मृतकाचा लहान भाऊ शेख तनबीर शेख रशीद यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या जबाबानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
रविवारी घरून आंघोळ करून व नवे कपडे परिधान करून शेख जहीर घराबाहेर पडला होता. मात्र गेले दोन दिवस तो घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले होते. दरम्यान आज सकाळी एका शेतकऱ्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आले. त्या शेतकऱ्याने नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतक शेख जहीर यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा सखोल तपास नांदगाव पेठ पोलिस पुढील तपास करत आहे.