[ad_1]
यंदाच्या पावसाळ्यात फुलंब्री तालुक्यात अल्प पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत असल्याने सध्या १३ गावांमध्ये १८ टँकरद्वारे आणि १२ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला
.
पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे राहिले. त्यामुळे अनेक विहिरींनी भर पावसाळ्यातच तळ गाठला होता. दोन महिन्यांपूर्वी बेमोसमी पाऊस पडल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. महिना-दोन महिने पुढे ढकलले गेले असले तरी पुन्हा पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. सद्यस्थितीत २५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Q. फुलंब्री तालुक्यात किती गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे?
A . सध्या १३ गावांना १८ टँकर सुरू आहेत. तसेच बारा गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.
Q. टँकर किती हजार लिटर पाण्याचे असते?
A. टँकर बारा हजार ते २४ हजार लिटरचे असतात.
Q. एका टँकरद्वारे गावांना पाणी पुरते का?
A. लहान गाव असल्यास एक टँकर आणि मोठे गाव असल्यास दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
Q. तालुक्याबाहेरून पाणी आणले आहे का?
A. नाही, सध्या तालुक्यात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यामध्येच विहीर अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश सुवर्णकार पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब, कान्हेगाव, पिंपळगाव वळण, एखघर पाडळी,वानेगाव, रेलगाव ,भालगाव, निमखेडा, मारसावळी, शहापूर,वाडी या गावांना विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता तापमानाचा पारा ४० अंशांवर असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. यामध्ये खामगाव, निधोना, मालोदेवाडी,पो फळा, बोधेगाव बुद्रुक, तळेगाव वस्ती, वावना, गेवराई गुंगी, सोनारी खुर्द, नायगव्हाण, उमरावती, हिवरा या १३ गावांना १३ टँकरद्वार १८ खेपा द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरने गावातील विहिरीत पाणी टाकले जात आहे.
विहिरींचा १२ गावांना आधार
फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब, कान्हेगाव,पिंपळगाव वळण, एखघर पाडळी,वानेगाव, रेलगाव,भालगाव, निमखेडा, मारसावळी, शहापूर,वाडी यागावांना विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यातयेत आहे. त्यामुळे आता तापमानाचा पारा ४० अंशांवरअसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.
अजुन तीन गावांवरटंचाईचे सावट
इतर गावांतही पाणीटंचाई निर्माण होतअसल्याने लवकरच पंचायतसमितीकडे प्रस्ताव दाखल होणारआहेत. सध्या विरमगाव, जातवा,आडगाव बुद्रुक,वाकोद या तीनगावांचे प्रस्ताव फुलंब्री पंचायतसमितीमध्ये दाखल झालेले आहेत.यावर लवकरच निर्णय घेऊनटँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारअसल्याची माहिती पंचायत समितीकार्यालयातून देण्यात आली.
[ad_2]