शुभांगी बोबडे,दहिवडी : सातारा जिल्हा परिषद अंत-र्गत माण पंचायत समितीत गटशि क्षणाधिकारी या पदावर कार्यरत असणारे लक्ष्मण महादेव पिसे यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वती-ने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२२-२३ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्काराचे वितरण सकाळी साडेदहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई येथे करण्यात आले होते. या पुरस्कार वितरणास राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकास विभागा चे प्रधान सचिव एकनाथ डवले, डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय आयुक्त आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामविकासासाठी अतुल्य योगदान देणाऱ्या व ग्रामविकासाच्या दिशेने ठोस पावले उचलणाऱ्या आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंचायतराज संस्था तसेच गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, -ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवामुळे पंचायतराज प्रणालीतील पारदर्शक कार्यक्षम आणि लोकाभिमुख कामगिरी करणाऱ्या अन्य संस्था, व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळेल.
दरम्यान या पुरस्कार वितरणास जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मुख्य अधिकारी, पुरस्कार प्राप्त अधिकारी, अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार अनुक्रमे वर्धा, अमरावती व सोलापूर जिल्हा परिषद यांना देण्यात आले. तर राज्यस्तरा-वरील उत्कृष्ट राज्यस्तरीय पंचायत समिती पुरस्कार कळमेश्वर जिल्हा नागपूर, जामनेर जिल्हा जळगाव व शिराळा जिल्हा सां-गली या पंचायत समिती यांना देण्यात आले. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे संबंधित जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.