एशिया कपमध्ये सातारच्या शार्दुल मोहितेने सुवर्ण पदक पटकावला  

0

सातारा/अनिल वीर : एशिया कप सहावी इंटरनॅशनल स्पर्धा, मुंबई (गोरेगाव) येथे पार पडली.यामध्ये श्री.व्हेंचर शतोकाॅन कराटे क्लब महाराष्ट्र,नागठाणे या शाखेचे प्रशिक्षक (सेन्साई) शार्दुल जीवन   मोहिते यांनी गोल्ड पदक पटकावले.

           शार्दुल मोहिते हा उरमोडी पुनर्वसन नागठाणे जांभळेवाडी (आष्टे )या गावचा रहिवासी असून त्यास आजोबांचा कुस्तेगिरीचा  वारसा लाभला होता. शिवाय, वडील यांचाही वारसा लाभला असल्याने वातावरण क्रिडा क्षेत्राशी संबंधित असल्याने प्रेरणा शार्दुल यास मिळाली.कराटे खेळा बरोबर हपकुडो बाॅक्सीगं आणि युनिफाईट  खेळही खेळत आहे. आजपर्यंत त्यांनी तालुका, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नॅशनल, इंटरनॅशनल तसेच क्रीडा विभागाच्या शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. आतापर्यंत गोल्ड,सिल्वर व ब्रॉंझ अशी सुमारे शेकडो पदक व प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. डबल ब्लॉक बेल्ट (सेकंड दान) आहे सद्या तो (सेन्साई) अक्षय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागठाणे व परीसरातील मुला मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. खेळाबरोबर रेफरी(पंच) म्हणूनही उत्तम काम करत आहे.या यशाबद्धल अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

फोटो : प्रशिक्षणार्थीसह सुवर्णपदक विजेता शार्दूल मोहिते.(छाया-अनिल वीर)