साई वेताळ ग्रुप,कळंबूसरेच्या शिबिरात ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) : राज्यातील  रक्ताची गरज असलेल्या थँलेसेमिया रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असून अश्या रुग्णांचे रक्ताअभावी जीवन संकटात आहे.या रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत “साई वेताळ ग्रुप, कळंबुसरे यांच्या सौजन्याने आणि “समर्पण ब्लड बँक, घाटकोपर” यांच्या सहकार्याने “श्री रामनवमी”  आणि मंडळाच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री. साईबाबा मंदिर, कळंबुसरे” येथे बुधवार दि १७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत  मंडळाचे सलग चौथे विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

  रुग्णांना मदत म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या सामाजिक उपक्रमात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उदघाटन साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या हस्ते झाले. या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर कळंबूसरेच्या सरपंच उर्मिला नाईक, उपसरपंच सारिका पाटील, ग्रा. सदस्य – प्रशांत पाटील, रेश्मा प्रकाश पाटील माजी सरपंच सुशील राऊत, बळीराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील. गाव अध्यक्ष महेश पाटील सी.एच.ए. आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश भगत, संघटक श्याम गावंड, खजिनदार मिलिंद म्हात्रे, सदस्य महेश गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात साई वेताळ ग्रुप कळंबुसरे अध्यक्ष नंदकुमार पाटील, सदस्य -नरेश पाटील, शैलेश पाटील,स्वप्नील पाटील, शुभम पाटील, रमेश म्हात्रे, प्रभुश्वर म्हात्रे, हर्षद पाटील, रंजित पाटील, क्षितिज म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे, यतिश भेंडे, अजित पाटील, सुयोग पाटील, विलास भेंडे, सचिन भेंडे, चेतन पाटील, जनार्दन पाटील, यांच्या समवेत गोवठणे विकास मंच अध्यक्ष सुनिल वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल वर्तक, मनीष पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here