युवकांनी आधुनिक समाजनिर्मितीसाठी कार्यरत राहिले पाहिजे ! 

0

सातारा : युवकांनी शिक्षण पूर्ण करून व्यवसाय/नोकरी करावी. आर्थिक स्वयंपूर्ण झाल्यानंतरच पुढारपण करावे. म्हणजे मागतकऱ्याची भूमिका राहणार नाही. तरच सामाजीक जाणिवेने कार्यरत राहू शकाल. अंधश्रध्दा व व्यसनाधीनता ही समाजास लागलेली किड आहे.तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठीही युवकांनीच पुढे आले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आधुनिक नव समाजनिर्मितीसाठी योगदान देता येईल.असे प्रतिपादन जयंत सामाजिक सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले.

                    विजयंता अकॅडमी, आंबेडकरनगर इस्लामपूर येथील सभागृहात कालकथीत विकास वाघमारे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजीत केलेल्या आदरांजलीपर कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे दादा मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, “समाजाचे आपण देणं लागतो. म्हणूनच पारदर्शक कारभार केला पाहिजे.कारण, समाज आपल्या कृतीकडे डोळसपणे पाहत असतो. तेव्हा विश्वासार्हता टिकविण्यासाठी स्वतः धम्माप्रमाणे आचरण करूनच आदी केले मग सांगीतले …. या युक्तीप्रमाणे समाजास मार्गदर्शन करावे.कोण अंधश्रद्धेपोटी नको त्या वाऱ्या करतात ? तर काहीजण पारंपारिक सण साजरे करून समाजाच्या निदर्शनासही आणून देतात.तेव्हा आपला धम्म सर्वश्रेष्ठ असला तरी लवचिकही आहे. तेव्हा केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये.मनुष्य हा परिपूर्ण नसतो.तो आयुष्यभर शिकत असतो.तेव्हाच परिपूर्णतेच्या दिशेकडे जाता येईल.धम्मामध्ये अनिष्ट गोष्टीसाठी बिलकुल थारा नाही. तेव्हा कुठेतरी थांबुन परिवर्तन करणे गरजेचे आहे.” यावेळी अनेक मान्यवरांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.

    सदरच्या कार्यक्रमास अनिल वीर,अमोल वाघमारे,प्रमोद कांबळे, निवास कांबळे, दिपक कांबळे, अरविंद ऊरुनकर, राहुल कांबळे,आकाश वीर,अशोक वीर,सौ.साधना वीर, मंगल वाघमारे,सुशीला अडसूळे, सौ. पूनम थोरवडे,सौ.सीमा थोरवडे, सौ.दीपाली अमोल वाघमारे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,उपासक, उपासिका, नातेवाईक,युवक-नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.बौद्धाचार्य आर.के.कांबळे यांनी सर्व विधी पार पाडला. नितीन कांबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here