रस्त्याच्या धोकादायक वळणांवर संरक्षण कठडा आणि डांबरी रस्ता बांधण्याची मागणी..

0

महाबळेश्वर, 27 एप्रिल: शिंदोळा बस स्टॉप पुढील चोर पाणी झरा येथील धोकादायक वळण आणि काळा कडा रस्त्यावरील वळणावर संरक्षण कटडा आणि डांबरी रस्ता बांधण्याची मागणीचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्तीने बांधकाम विभाग उप अभियंता मेढा जावळी यांना देण्यात आले .

निवेदनात म्हटले आहे की, शिंदोळा बस स्टॉप पुढील चोर पाणी झरा येथील वळण अतिशय धोकादायक आहे आणि अनेक अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच, काळा कडा रस्त्यावरील वळणावर डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता यांच्यामध्ये अंतर असल्यामुळे वाहनांना वारंवार अडथळा निर्माण होतो. पावसाळा जवळ येत असल्याने या दोन्ही ठिकाणी तातडीने संरक्षण कटडा आणि डांबरी रस्ता बांधणे आवश्यक आहे.

निवेदन देण्यास तालुकाप्रमुख संतोष आप्पा जाधव, उप तालुकाप्रमुख राजाभाऊ घाडगे, महाबळेश्वर शहरप्रमुख राजूभाऊ गुजर, उपशहर प्रमुख उस्मान भाई खारखंडे, सचिन चव्हाण आणि अमोल साळुंखे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here