सिव्हिल हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार विरोधार्थ वंचितचे आंदोलन

0
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : येथील सिव्हिल हॉस्पिटल तथा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वैद्यकीय प्रतिपूर्ती विभागामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सर्जन डॉ. सुभाष चव्हाण, विभाग प्रमुख झोरे मॅडम व लिपिक नांगरे यांची खातेनिहाय चौकशी करावी. शिवाय,संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी नेमुन आर्थिक ऑडिट होणे गरजेचे आहे.यासाठी जिल्हा वंचिततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

    जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी यांचे व कुटुबियांचे मेडिकल बिल तपासणीसाठी सिव्हील सर्जन यांच्याकडे जात असते. शासकिय सेवेत असताना अचानकपणे आजार उद्भवल्याने सरकारी कर्मचांन्याना आर्थिक बाजूंचा सामना करावा लागतो. यामधुन रिलीफ मिळावे. यासाठी संबधित आजाराच्या संदर्भाने योग्य ते कागदपत्रे गोळा करून वैदयकीय प्रतिपूर्तीसाठी तपासणीसाठी विभागामार्फत पाठवली जातात. परंतु, ज्यावेळेस बिल मंजुरीसाठी येतात. त्यावेळेस वैदयकीय प्रतिपूर्ती विभागाच्या कलार्क व टेबल प्रमुख आर्थिक जुळवाजुळव केल्याशिवाय बील मंजुर करीत नाहीत. त्यासाठी

बिलानुसार ७ टक्के/१० टक्के/ १५ टक्केसुद्धा आर्थिक भुर्दंड सरकारी कर्मचाऱ्याला सहन करावा लागत आहे. तोंड दाबुन बुक्यांचा मार सरकारी कर्मचा-यांना होत आहे.

    वैद्यकीय प्रतिपूर्ती विभागामध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार सिव्हील सर्जन डॉ.सुभाष चव्हाण, विभाग प्रमुख झोरे मॅडम व लिपिक नांगरे यांच्या संगनमताने सुरू आहे. मेडिकल बिलाच्या नावाने लाखो रुपयांची माया या तिघानी जमा केली आहे. याबाबतच्या लेखी तक्रारी आमच्याकडे आहेत.तेव्हा वंचितच्या मागणीनुसार येत्या ८ दिवसामध्ये सर्जन डॉ सुभाष चव्हाण, झोरे मॅडम व लिपिक नांगरे यांची खातेनिहाय चौकशी करावी. संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-याचा मार्फत आर्थिक ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या नाहीत तर मात्र आम्हाला यापेक्षाही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल.वेळप्रसंगी आम्हाला सरकारी कर्मचा-याचा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढावा लागेल.यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.सदरच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई , जिल्हा महासचिव गणेश भिसे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे,दिपक चव्हाण,सतिश कांबळे,शशिकांत गंगावणे,प्रमोद शिरसागर,ओबीसी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,उमेश खंडझोडे , दिपक धडचिरे,सुरेश गायकवाड , सुहास पुजारी ,दत्तात्रय सावंत, विजय वानखेडे ,आबाजी मोरे , संभाजी आवले,अतुल कांबळे , विशाल आवाड, मिलिंद कांबळे, शुभम कांबळे,बाळू निकम, अमोल गंगावणे,राजू बाबर , सुदर्शन मोहिते,सुनील भिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील आंदोलनास रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला असल्याचीही माहिती गणेश भिसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here