नगर – थोर विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा लिखित व आर.के .सोनाग्रा प्रकाशन निर्मित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समग्रा जीवन चरित्रा’वर प्रकाश टाकणार्या साहित्य कृतीच्या जनता आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि.28 एप्रिल 2023रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल ब्रह्मभोज, राजगोल्ड हॉल, आकाशवाणी समोर, सावेडी, अ.नगर येथे माजी आ. दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विचारवंत संजय आवटे (पुणे), डिप्रेस्ड क्लास मिशनचे सेक्रेटरी विशाल शेवाळे (पुणे), निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे, भि.ना दहातोंडे, ग्रंथमहर्षी लक्ष्मीनारायण रोहिवाल, वसंत विटणकर, शशिकांत मुथा, अशोक गायकवाड, संजय खामकर, प्रा जवाहर मुथा, परिमल निकम, सुरेश बनसोडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे . तरी जिल्ह्यातील चळवळीतील सर्व कार्यकर्ते, अभ्यासक यांनी संजय आवटे यांच्या बौद्धिक विचारधन वेचण्यासाठी समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन शाहीर अरुण आहेर यांनी केले आहे.
विश्व धर्माचे उपासक, उपेक्षित, वंचित.,दीन दलितांचे उद्धारक, कर्मयोगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले, दीन, दलितांचा तारणहार, कर्मयोगी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती भेद रहित विश्व कल्याणाचा व मानवतेचा संदेश सर्व जगताला दिला आहे. या विभूतीच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव या साहित्य कृतीत करण्यात आला आहे.