स्टेशन रोड येथे साईनाथ हॉस्पिटलचा नूतन वास्तूत शुभारंभ
नगर – रुग्णसेवेचा संकल्प मनाशी बाळून सर्वसामान्यांना परवडेल अशी अत्याधुनिक दर्जाची वैद्यकीय सेवा साईनाथ हॉस्पिटल उपलब्ध करुन देत आहे. गोर-गरीबांची सेवा करता-करता रुग्णसेवेत येणार्या अडथळ्यांना सामोरे जात सामाजिक बांधिलकीची जोपासली जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतांना अनुभव व विश्वासही महत्वाचा असतो. जिद्द, मेहनत, चिकाटी व अनुभवाच्या जोरावर साईनाथ हॉसिटल रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देतील, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
नगरमधील स्टेशन रोड, लोखंडी पुल, आनंदनगर येथील साईनाथ हॉस्पिटल ट्रॉमा व क्रिटीकल केअर सेंटरचे स्थलांतर व नवीन वास्तूचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ.महेश वीर, जि.प.सदस्या राणीताई लंके, उद्योजक भागचंद झांजे, सीताराम काकडे, निवृत्त शिक्षणाधिकारी मनोहर वीर, मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, संचालक डॉ.बाळासाहेब गाडे, डॉ.अक्षय फिरोदिया, डॉ.अमित कुलांगे, डॉ.उत्तम पठारे, प्रथमेश गाडे, तन्मय गाडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.महेश वीर म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. त्याचबरोबर आजारही वाढत आहेत. अचुक निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते. साईनाथ हॉस्पिटलमधील अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने चांगल्या सुविधा रुग्णांना मिळतील, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्योजक भागचंद झांजे म्हणाले, डॉ.बाळासाहेब गाडे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ग्रामिण भागातून शिक्षण घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. डॉक्टर म्हणून गरीब व गरजू रुग्णांवर चांगली सेवा देत मोठा विश्वास संपादन केला आहे. रुग्णांची योग्य ती काळजी घेत माफक दरात उपचार करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. छोट्याशा दवाखान्याचे आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असलेले रुपांतर ही त्यांच्या कार्यकर्तुत्वाची पावती असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात डॉ.बाळासाहेब गाडे म्हणाले, रुग्णांचा विश्वास सार्थ ठरवत रुग्णसेवा ईश्वर सेवा मानून कार्य करतांना रुग्णांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला. याच विश्वासाच्या जोरावर साईनाथ हॉस्पिटल आता नूतन वास्तूतून उत्कृष्ट व अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याठिकाणी जनरल व आयुर्वेद उपचार, मेडिसीन आय.सी.यू., अॅक्सिडेंट ऑर्थोपेडीक, जनरल सर्जरी, सुसज्ज आपॅपरेश थिएटर, सी-आर्म, डिजिटल एक्स-रे, कॉम्प्युटराईज्ड लॅबोरेटरी, फिजिओथेरपी, लसीकरण सुविधा, ई.सी.जी., मेडिकल स्टोअर आदि सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पोकळे यांनी केले तर आभार डॉ.अक्षय फिरोदिया यांनी मानले. कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.