शिर्डी : पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्यसरकार कडून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. आज राज्य सरकारने राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यामध्ये पी. शिव शंकर याना साईबाबा संस्थानचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले. जवळपास गेल्या एक वर्षांपासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी पद रिक्त होते. त्या जागेवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे प्रभारी कारभार पाहत होते. मात्र साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आधीच बरखास्त झाले असल्याने त्रिसदसिय समितीच्या सल्ल्याने संस्थांचा कारभार सुरु आहे. त्रिसदस्यांच्या वेळेअभावी संस्थांचा कारभार करण्यास प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव याना अनेक अडचणी येत होत्या . शंकर यांच्या नियुक्तीमुळे संस्थानला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्याने साईभक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.
