कोपरगाव : कोपरगाव सब जेल मधील सांड पाण्याचे तळे साचले असून या शासकीय तळ्याचा साचलेल्या गटारीच्या पाण्याच्या डबक्याचा ) त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
विविध गुन्ह्यात कैदी असले तरी त्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. कोपरगाव तहसील कार्यलया शेजारी सब जेल ची जुनी इमारत आहे या ठिकाणी कोपरगाव शहर,तालुका,शिर्डी,राहता आणि लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील कैदी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे या जेल मध्ये पाच सहा बराकी असून क्षमते पेक्षा जास्त कैदी या बराकी मध्ये आहे .
या बराकी मध्येच कैद्यांच्या अंघोळ व बाथरूमच्या व्यवस्था असतात मात्र या ठिकाणी असलेल्या सांड पाण्याच्या पाईप लाईन फुटल्या मुळे जेलच्या पूर्वेकडे असलेल्या भिंती लगत मोठे सांड पाण्याचे तळे साचले असून या ठिकाणी शहरातील डुकरे,कुत्रे मुक्त पणे संचार करत असतात तसेच या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास झाले आहे तसेच तहसील कार्यालयाच्या पूर्व बाजूला अनेक नाष्टा देणारी हॉटेल आहेत. मात्र या साचलेल्या तळ्या मुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाली असून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एका बाजूला तहसील कार्यालय शासनाच्या आरोग्य विषयक योजना व स्वच्छते च्या जाहिराती लावते मात्र दस्तुर खुद्द तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सब जेल जवळ सांड पाण्याचे तळे निर्माण झाले असून सब जेल प्रशासनाने या शासकीय तळ्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपेक्षा मात्र नगरपालिकेकडून …… कोपरगाव सब जेलच्या देखभाल दुरुस्तीची जबादारी सार्वजनिक बांधकाम खात्याची (पी डब्लू डी) आहे. आतापर्यंत सब जेल इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची कायमच बोंब राहिली राहिली आहे. सब जेलची निधी अभावी दुरुस्ती रखडलेली असते . दुरुस्ती कामाकरिता निधीची मागणी आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची (पी डब्लू डी) असताना अधिकारी आपली जबादारी झटकताना दिसतात .मात्र असे असताना तहसीलदारांकडून नगरपालिकेला सदर डबक्याची साफसफाई करण्याची विनंती केली जात आहे.