तृष्णा महाकैदशीण
लढा दिलाअविश्रांत
कृपा तथागता तुझी
निर्बंध मुक्त हो प्रांत
बुद्ध साहित्य संपन्न
संपदाअमोल अनंत
आर्य सत्य आचरता
निखळेल दुःख खंत
स्तुप विहारात जाऊ
बोधिवृक्ष तळी शांत
विचार यावे आचारा
चिंतन मंथन निवांत
दहा पारमिता पहा
गळेलं क्षणात खंत
अष्टांगिकमार्गे जाता
मिटेलं जीवना भ्रांत
जपावा पंचशीलमंत्र
चांगली लाभे उसंत
बौध्द विचार धारेचा
निर्झर वाहता जिवंत
परिवारासहीत चर्चा
सगळेचं होऊ श्रीमंत
जयंती साजरी करी
मिळेल आनंदअत्यंत
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.