गौतम बुद्धा ..

0

बोधी वृक्षा खालती

केले  खडतर ध्यान

सिध्दार्थ झाले बुद्ध

लाभले  दिव्य ज्ञान

तृष्णेची  येई  जाण

दिव्य ज्ञान  निर्वाण

दिव्यप्रकाशी न्हाही

सामान्यजनअजाण

धम्म  केला स्थापन

सकल जगत् ध्यान

कळले दु:खाचेमूळ

उपाय शोधला छान

जरादारिद्र्य मृत्यूचे

अटळसत्याचे भान

आर्यसत्य पंचशील

अर्पिले अभय दान

शील  प्रज्ञा समाधि

धम्माची अंगे प्रदान

पारिमिता तत्वसत्व

जागेवर ये अवधान

आपण जन्मला इथे

भारतभूचा  सन्मान

शतके  लोटली  तरी 

अजरामर अभिमान

– हेमंत मुसरीफ पुणे .

  ९७३०३०६९९६.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here