नमो बुध्दाय् ..
लढाया हव्या कशाला
जिंका आधी स्वताला
विचार सुंदर दिधला
गौतमाने या जगाला
नको भुतकाळी गुंता
स्वप्नातउगाचं हरवता
वर्तमान आपले हाती
भ्रमात फुका मिरवता
आग धगधगे ओठांत
क्रोध उसळता मनात
पंचशील तत्वे जाणा
आनंद संपन्न मौनात
बौद्ध धम्म अंगिकारी
सांभाळ भावना तोल
तथागत अष्टांग मार्ग
मार्ग जागृत अनमोल
दहा पारमिता जागा
प्रकाशित केले जगा
निर्वाण अर्थ समजून
रे संतप्त जीवन जगा
विज्ञानअधिष्ठित दृष्टी
बनवा सोज्वळ सृष्टी
समता बंधुत्व करुणा
कुणीही ना राहो कष्टी
बुध्द …
घर बांधता पाहतो
केवढे वास्तु शास्त्र
विसरतो गौतमाचे
छान संस्कार मात्र
सुखशांतीसाठी हवा
घरात लाफींग बुध्दा
तोंड ठेवतो सुतकी
परंतु वस्तुवर श्रध्दा
वस्तु सुंदर फेंग शुई
सारं घर गेलं भरूनं
मन मात्र रिकामेचं
अतीव हाव करून
अनेक विविधवस्तुंने
बंगलाअख्खा भरला
माणसांना बसायला
कोपराही ना उरला
श्रध्दा असावी जरूर
समजून घ्यावं शास्त्र
मनी शिरे अंधश्रद्धा
मग होई शास्त्र शस्त्र
कळताचं संमासंबुद्ध
संपेल मनातले युध्द
बोधिसत्व वृक्ष छाया
करेल जीवन हे शुध्द
– हेमंत मुसरीफ पुणे .
९७३०३०६९९६.