वसुंधरेचं वाळवंट होता कामा नये : जागतिक पर्यावरण दिन

0

download (1).jpg

दरवर्षी जगभर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख साधन आहे. सृष्टी हे सजीव व निर्जिव वस्तुचे मिश्रण आहे, झाडे ही जीवन आहे. सृष्टीकर्त्याने जीवनाचे मिश्रण अशा प्रकारे केले आहे की, ते सृष्टीच्या जीवनचक्राला संतुलीत ठेवते. कोणत्याही सजीव निर्जीव रचनेसोबत मनुष्याने केलेल्या छेडछाडीचे परिणाम संपूर्ण जीवन सृष्टीला भोगावे लागतात. वृक्षवल्ली हा या सृष्टीचा खरा आधार आहे. तेव्हाच राज्य हिरवेगार होईल आणि आपण प्रदुषण विरहित वातावरणात स्वच्छंद श्वास घेवू यासाठी सर्वांनी कटीबध्द राहावे, कारण तो जीवकी प्राण आहे “झाडे लावा आणि जगवा व अमूल्य असे जीवन वाचवा”.

               जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी, कार्यक्रमाने व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.

             आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटामाटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्तिथी किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते. यासर्वांतूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते. आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी सर्वानी घ्यावी. जवळपास पाच दशकांपासून जागतिक पर्यावरण दिन जागरूकता वाढवत आहे, कृतीला समर्थन देत आहे आणि पर्यावरणासाठी बदल घडवून आणत आहे. जागतिक पर्यावरण दिनाची थीम “ग्रीन सिटीज” होती आणि घोषणा होती “प्लॅन्ट फॉर द प्लॅनेट!” २००५ ला साध्य केली. विषय वाळवंट आणि वाळवंटीकरण होता आणि “वाळवंटात कोरडवाहू नको” असे घोषवाक्य होते.

                 २०११ च्या जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन भारताने केले होते. दिवसाचे यजमानपद भूषवण्याची भारताची ही पहिली वेळ होती. २०११ ची थीम ‘फॉरेस्ट्स – नेचर अॅट युवर सर्व्हिस’ होती. समुद्र किनारा स्वच्छता, मैफिली, प्रदर्शने, चित्रपट महोत्सव, सामुदायिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि बरेच काही यासह जगभरात हजारो उपक्रम आयोजित केले गेले. भारतात नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी जनजागृती करण्यासाठी कदंबचे रोपटे लावले. भारत येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम २०१८ ची थीम “बीट प्लास्टिक पोल्युशन” होती. यजमान राष्ट्र भारत होता. ही थीम निवडून, प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा भार कमी करण्यासाठी लोक त्यांचे दैनंदिन जीवन बदलण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे. लोक एकल-वापर किंवा डिस्पोजेबलवर जास्त अवलंबून राहण्यापासून मुक्त असले पाहिजे कारण त्यांचे गंभीर पर्यावरणीय परिणाम आहेत. आपण आपली नैसर्गिक ठिकाणे, आपले वन्यजीव आणि आपले स्वतःचे आरोग्य प्लास्टिकपासून मुक्त केले पाहिजे. भारत सरकारने 2022 पर्यंत भारतातील सर्व प्लास्टिकचा एकच वापर दूर करण्याचे वचन दिले आहे.

औद्योगीकीकरण आणि शहरीकरणांच्या प्रक्रियेत प्रदुषणाची समस्या देखील अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. पर्यावरणाला या हानी पासुन वाचविण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टिने “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।” ही सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराजांची शिकवण आचरणात आणुन अख्या महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात वृक्षरोपणाचा उपक्रम हाती घेतला पाहिजे. एकीकडे वृक्षरोपणाचा गाजावाजा करीत झाडे लावली जातात परंतू नंतर त्याची निगा राखली जात नाही. मृतपाय अवस्थेत ती झाडे असतात ही शोकांतीका आहे. तेव्हा राज्यात मोठया शहरातील महानगर पालीका, नगर पालीका, ग्राम पंचायती, नगर परिषदा यांना वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यासाठी सक्ती केली पाहिजे. कारण राज्याच्या प्रमुख शहरातील वृक्ष तोड सारखी वाढते आहे. त्यामुळे शहरातील सौंदर्यीकरण व सुशोभीकरण असलेले शहरे वृक्ष नसल्यामुळे पार शहरे बकाल होत चाललेली आहेत. त्यामुळे पर्यावरणात सारखी वाढ होत आहे. जिकडे-तिकडे प्रदुषण पाय पसरवित असल्यामुळे आरोग्य असुरक्षीत आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकीकरणामुळे निर्माण होणारा नैसर्गीक असमतोल दुर करण्यासाठी तसेच स्वच्छ व हरीत पर्यावरणाच्या निर्मीतीसाठी प्रकल्पाची संकल्पना शासनाने साकारली पाहिजे.

जमीन मोकळी करण्यासाठी राजकिय आंधळेपणाचा आणि हव्यासातून आलेल्या आततायीपणाचा शासनामार्फत बुलडोजर सैरावैरा वृक्ष छाटीत निघाला आहे. पण पर्याय शोधला नाही उलट सिमेंट रस्त्याची भर त्यामुळे वातावरण दुषित होणं स्वाभाविक आहे. घरं रचली जातील, अहो पण वृक्ष नसतील तर माणसं कोसळतील त्याचं काय ? या जाणीवेनं वृक्ष वाचवा यासाठी संघर्ष समिती तयार करण्याची गरज आहे. ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’. नुसतं झाडं लावून भागणार नाही तर त्याची निगा राखली पाहिजे, जपवणुक केली पाहिजे. तेव्हा कुठे पर्यावरणाला बाधा होणार नाही तर सृष्टी नटलेली दिसेल बहर आलेला असेल अशावेळी झाडाची काळजी घेतली नाही तर वसुंधरेचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ हा मंत्र प्रत्येक नागरिकानं आत्मसात करुन येणाऱ्या पावसाळयात एक तरी झाड लावून आपलं कर्तव्यपणाला लावावे, जेणेकरुन पर्यावरण दिन साजरा करण्याचं सार्थक होईल. सर्व पर्यावरण प्रेमींना आज जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रविण बागडे

नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here